केवळ मराठा समाजा करता नव्हे तर सर्वच समाजाकरता मंडळाने दालने खुली केली आहेत, हे मंडळाच्या
निरनिराळ्या उपक्रमांवरून सिद्ध होते.
’बहुजन हिताय बहुजन सुखाय’ शिक्षणप्रसार हे मंडळाचे ब्रीद आहे.
वैविध्यपूर्ण तसेच सातत्यपूर्ण समाजोपयोगी प्रकल्पांमधून अकोला जिल्हा मराठा मंडळ समाजऋण फेडत असते.

१) दसरा संमेलन

अकोला जिल्हा मराठा मंडळ दरवर्षी दसरा संमेलन मोठ्य़ा प्रमाणात साजरे करते. या विस्तारामधे ज्यांनी मोलाचे सहकार्य केले त्यांचा तसेच समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव तसेच सत्कार या प्रसंगी केला जातो.

२) मोफत वसतिगृह

मराठा व इतर समाजातील गरीब होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकरता मोफत राहण्याची सोय दरवर्षी मंडळ करते. गरीब मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देऊन समाजऋण फेडले जाते.

३) मुलींचे वसतिगृह

अकोला जिल्हा मराठा मंडळाने बदलत्या काळाची पावले ओळखून सर्व समाजातील मुलींना देखील शिक्षणासाठी निवासाची सोय उपलब्ध करून दिली आहे. मंडळाच्या शेलार फैल येथील जुन्या वास्तूचे नूतनीकरण करून त्याचे रूपांतर मुलींच्या अद्यावत वसतीगृहात केले गेले आहे.

४) महिला शिवणक्लास

होतकरू मुलींना व्यावसायिक शिक्षण मिळावे या हेतूने हा उपक्रम सुरू करण्य़ात आला आहे. सर्व समाजातील मुलींना या क्लासमधे प्रशिक्षण घेता येते.

५) लिटल स्टार कॉन्व्हेंट

सर्व समाजातील मुलांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेण्याची सोय ही या शाळेची महत्वाची उपलब्धी आहे. शाळेविषयी अधिक माहिती जाणून घेण्य़ासाठी येथे क्लिक करावे.

६) वधू-वर सूचक केंद्र

समाजातील उपवर उपवधू मुली तसेच मुलांच्या लग्नाची जुळवाजुळव करणे सुलभ व्हावे हा या केंद्राचा उद्देश. मंडळाने बरेचदा वधू-वर मेळावे तसेच पालक मेळावे भरवून या उपक्रमास चालना दिली आहे,

७) सामूहिक विवाह

अत्यल्प खर्चात विवाहसोहळा संपन्न व्हावा तसेच याविषयी समाजात जागृती निर्माण व्हावी या हेतूने सामूहिक विवाहांचे आयोजन केले जाते.

८) जिजामाता जन्मोत्सव

मॉं जिजाऊ यांचे स्मरण म्हणून दरवर्षी मंडळ जिजामाता जन्मोत्सव साजरे करते. प्रबोधनाबरोबरच यात स्त्रिया व मुलींच्या शैक्षणिक कार्याचा गौरव केला जातो.

९) मंगल कार्यालय

मराठा मंदिर सभागॄह सर्व सुविधांसह भव्य स्वरूपात बांधले गेले आहे. लग्न कार्य तसेच इतर समारंभांसाठी अतिशय उपयुक्त अशा या सभागृहाच्या बुकिंगसाठी संकेतस्थळाच्या नावाच्या वर दिलेल्या फोन नं. वर संपर्क साधावा.