old

संस्थेची स्थापना

अकोला शहरात स्थायिक झालेल्या  मराठा माणसांनी सामाजिक बांधिलकी मानून सन १९२२ मधे दसर्‍याच्या सुमुहूर्तावर मराठा मंडळाची मुहूर्तमेढ रोवली. स्थापना –  १- १०- १९२२ (कार्यालय – रामदासपेठ, पोलीस स्टेशनजवळ, अकोला ४४४००१) आज अकोला जिल्हा मराठा मंडळाचा व्याप अनेक पटींनी वाढला आहे.

जागतिक महिला दिन

महिला समिती

मॉं जिजाऊ यांच्या प्रेरणेने समाजातील महिलांसाठी विशेष कार्य करता यावे या हेतूने अकोला जिल्हा मराठा मंडळाच्या ’महिला समितीची’ स्थापना करण्यात आली आहे. ही समिती महिलांसाठी दरवर्षी अनेक उपक्रम राबवते.प्रबोधनाबरोबरच यात स्त्रिया व मुलींच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा गौरव केला जातो.

डॉ. भांबुरकर यांचा सत्कार करताना श्री. रणजित सपकाळ

प्रकल्प

केवळ मराठा समाजा करता नव्हे तर सर्वच समाजाकरता मंडळाने दालने खुली केली आहेत, हे मंडळाच्या निरनिराळ्या उपक्रमांवरून सिद्ध होते. ’बहुजन हिताय बहुजन सुखाय’ शिक्षणप्रसार हे मंडळाचे ब्रीद आहे. वैविध्यपूर्ण तसेच सातत्यपूर्ण समाजोपयोगी प्रकल्पांमधून अकोला जिल्हा मराठा मंडळ समाजऋण फेडत असते.

विविध उपक्रम

विविध उपक्रम

महिला समिती जिजाऊ जन्मोत्सव, शारदोत्सव, महिला दिन,आरोग्यनिदान शिबीर,  शिवणकला वर्ग, महिलांसाठी विवीध स्पर्धा, यशस्वी महिलांचा सत्कार असे विवीध तसेच प्रबोधनपर उपक्रम राबवत असते. समाजातील महिलांचा सर्वतोपरी विकास व्हावा तसेच त्यांचे या निमित्त्याने एकत्रीकरण ह्वावे या हेतूने हे उपक्रम आयोजित केले जातात....

Read more

मान्यवरांचे मनोगत

लिटील स्टार हायस्कूल बद्दल

मंडळाच्या अनेक उपक्रमांपैकी १९९० मधे इंग्रजी माध्यमाच्या शाळेची सुरूवात ही एक महत्वाची उपलब्धी आहे. माफक शुल्क घेऊन या शाळेत दर्जेदार शिक्षण दिले जाते. शास्त्रशुद्ध ज्ञान मिळवायचे असेल तर विद्यालयाला पर्याय नाही, त्याचबरोबर आजच्या युगात मुलांचे बालपण हिरावले जाऊ नये याची काळजी विद्यालयाने घ्यायला हवी. आजचा विद्यार्थी हा उद्याचा नव्हे तर आजचाच नागरिक आहे. हे लक्षात घेऊन काळानुसार योग्य ते बदल संस्था करत राहीलच.

श्री. प्रकाश पोहरे

क्षणचित्रे

अकोला जिल्हा मराठा मंडळ या संस्थेच्या कार्याची आपल्याला माहिती व्हावी, त्यात आपला हातभार लागावा तसेच संस्थेच्या कार्यालयाचे बुकींग करणे सुलभ व्हावे या हेतूने या संकेतस्थळाची निर्मिती करण्य़ात आली आहे. आपल्या सूचना , अभिप्रायांचे स्वागत आहे.

मा. रणजित सपकाळ दीपप्रज्वलन करताना
मराठा मंडळ आमसभा व दसरा संमेलन
ltlstar