’बहुजन हिताय बहुजन सुखाय’ शिक्षणप्रसार हे मंडळाचे ब्रीद आहे

 

आज अकोला जिल्हा मराठा मंडळाची उद्दिष्टये व व्याप जरी अनेक पटींनी वाढला असला तरी ज्या वेळेस ते स्थापन झाले त्यावेळी एकच उद्दिष्ट्य होते ते म्हणजे अकोला जिल्ह्यातील मराठा समाजातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची अकोला येथे राहण्याची व जेवण्याची माफक खर्चात सोय करणे व त्यांच्या शिक्षणाकडे लक्ष पुरविणे. यामुळे अनेक होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्य़ाची संधी मिळाली. याचा हजारो विद्यार्थ्यांना फायदा झाला. येथील विद्यार्थ्यांनी सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात चांगला लौकिक मिळवला व वसतिगृहाला आणि मंडळाला प्रतिष्ठा मिळवून दिली.

 

मराठा मंडळ अंतर्गत आता सुरू असलेले विविध उपक्रम

१) मोफत वसतिगृह
२) मुलींचे वसतिगृह
३) महिला शिवणकला केंद्र
४) लिटल स्टार कॉन्व्हेंट
५) मंगल कार्यालय
६) वधू-वर परिचय केंद्र
७) सामूहिक विवाह
८) व्यवसाय मार्गदर्शन
९) टॅलेंट सर्च परिक्षा मार्गदर्शन केंद्र